केवळ मतांसाठी वापर करणाऱ्यांना हद्दपार करा : विठ्ठल चोपडे
निवडणुका आल्या की मतदार, नागरिक यांची आठवण काढणाऱ्या प्रस्थापितांना हद्दपार करा व येत्या निवडणुकीत मतपेटीतून कॉम्रेड के. एल. मलाबादे यांच्या प्रमाणेच विजयाचा इतिहास घडवा, असे आवाहन अपक्ष उमेदवार विठ्ठल चोपडे यांनी आज गणेश नगर परिसरात बोलताना केले. विठ्ठल चोपडे म्हणाले, प्रस्थापितांच्या कार्यालयात गेल्यानंतर कोणता अनुभव येतो, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. कार्यकर्त्यांना, नागरिकांना आपणास्पद अपमानास्पद वागणूक मिळणे हे नवीन राहिलेले नाही. त्यांची पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी ही होत असतात. त्यामुळे या निवडणुकीत वचपा काढण्याची संधी असून प्रस्थापितांना घरी बसवा व एका सामान्य कुटुंबातील माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विधानसभेत पाठवा, असे आवाहन विठ्ठल चोपडे यांनी यावेळी केले. या पदयात्रेत विठ्ठल चोपडे यांनी गणेश नगर परिसरातील नागरिकांशी संवाद साधला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न रखडला असून गणेश नगर परिसरात नागरिकांचे होणारे हाल जवळून पाहिले आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मतभेटीतून चमत्कार घडवा, असे आवाहन चोपडे यांनी यावेळी केले. या पदयात्रेत अजय जाधव, अण्णा महामुनी, मोहसीन मोमीन, पिंटू पाटील, शाहरुख मोमीन, आकाश घाडगे आजी मोमीन दीपक जाधव भैय्या जाधव आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.