प्रचारासाठी वासुदेव कलाकारांचा वापर करणाऱ्या पालकमंत्र्यांचे हेच पुरोगामीत्व काय ? ; समरजितसिंह घाटगे
छत्रपती शाहू महाराजांची जन्मभूमी असलेल्या कागलने संपूर्ण देशाला पुरोगामीत्वाचा विचार दिला. अशा भूमीत पालकमंत्र्यांना प्रचारासाठी वासुदेवाच्या वेशभूषेतील कलाकारांचा वापर करावा लागतो. हेच त्यांचे पुरोगामीत्व काय ? असा परखड सवाल महाविकास आघाडीचे उमेदवार समरजितसिंह घाटगे यांनी उपस्थित केला. माद्याळ ता.कागल येथे त्यांच्या प्रचारार्थ झालेले जाहीर सभेत बोलत होते. घाटगे पुढे म्हणाले,पालकमंत्री गेल्या पंचवीस वर्षात विकास कामांचा डोंगर उभारला म्हणतात. त्यांनी खरं म्हणजे विकासकामांच्या जोरावर मते मागायला पाहिजेत.मात्र त्यांना भारतीय संस्कृतीतील पारंपरिक लोककलाकार असलेल्या वासुदेव यांचा प्रचारासाठी वापर करावा लागत आहे हे दुर्दैवी असून त्यांच्या पायाखालची वाळू घसरल्याचे हे द्योतक आहे.
(वसुंधरा शक्ती न्यूजसाठी कापशी प्रतिनिधी यशवंत पाटील)