खोतवाडीचा सर्वांगीण विकास करणार : विठ्ठल चोपडे

खोतवाडीची सर्वांगीण विकास करणार : विठ्ठल चोपडे 


इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विठ्ठल चोपडे यांनी आज खोतवाडी परिसरात पदयात्रा काढली. या पदयात्रेला तरुण कार्यकर्ते, महिला, युवक, युवती यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. खोतवाडी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात असले तरी खोतवाडीची उपेक्षा झाली आहे. खोतवाडी परिसरात यंत्रमाग उद्योग वाढला आहे. शिवाय नागरी वस्ती वाढली आहे. त्यांच्या समस्या जैसे थे आहेत. सर्व नागरी प्रश्नांची सोडवणूक करून परिसराचा विकास करण्याची ग्वाही विठ्ठल चोपडे यांनी कार्यकर्ते, महिला, भागातील नागरिक यांच्याशी चर्चा करताना दिली. यावेळी संजय साळुंखे, सुनील फराकटे, मंगेश खांडेकर, अक्षय खोत, मुहापीज सुतार, अक्षय खोत, दशरथ सांगलीकर, शशिकांत कांबळे, स्वप्निल कदम, शहाणाप्पा हिरेमठ, किशोर पडियार आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post