हेरवाडमध्ये दहावी उत्तीर्ण विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

हेरवाडमध्ये दहावी उत्तीर्ण विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

हेरवाड ता. शिरोळ येथील इंद्रायणी राजेंद्र मोहिते वय १६ या दहावी उत्तीर्ण विद्यार्थिनीने घरात कोणीही नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. इंद्रायणीने राहत्या घराच्या हॉलमधील लाकडी तुळईला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. याबाबतची माहिती विश्वजित शंकर बिडकर वय ३६, रा. ब्राह्मणपुरी गल्ली, कुरुंदवाड यांनी कुरुंदवाड पोलिस ठाण्यात दिली. इंद्रायणी ही अभ्यासू व शांत स्वभावाची मुलगी होती. तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण समजू शकलेले नाही. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरु आहे. मृतदेहेचे कुरुंदवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेने हेरवाड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post