पूर्व वैमनस्यातून तलवार हल्ला ; मुख्य आरोपीसह पाचजणांना अटक

पूर्व वैमनस्यातून तलवार हल्ला ; मुख्य आरोपीसह पाचजणांना अटक

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पूर्ववैमनस्यातून तलवारीने हल्ला करून दोन तरुणांना जखमी करण्यात आले. या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी मुख्य आरोपी आदित्य ऊर्फ गब्बर सूर्यवंशीसह पाच जणांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये अनिकेत अमर सूर्यवंशी (२२), आदित्य ऊर्फ गब्बर अमर सूर्यवंशी (२६), सुजल युवराज ढेरे (१९), प्रतीक विजय नागावकर (२०) आणि ओंकार कुमार समुद्रे (२४) यांचा समावेश आहे. तर तेजस संतोष जगताप आणि तुषार कुमठे हे दोन संशयित अद्याप फरारी आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली. शनिवारी २१ जून रोजी सायंकाळी दोन गटांत वादातून हाणामारी झाली. त्यात श्रीनाथ गंगाराम कुचकोरवी (२८) आणि आकाश विनोद सकटे हे दोघे जखमी झाले. घटनेनंतर आदित्य चौक परिसरात दोन्ही गटांचे समर्थक जमा झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत रात्री उशिरा संशयितांना अटक केली. प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

Post a Comment

Previous Post Next Post