महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांचा नागरिक व खेळाडूंची संवाद
महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांनी आज भगतसिंग गार्डन, जय हिंद मंडळ, राजाराम मैदान, राणीबाग या ठिकाणी नागरिक व खेळाडूंची संवाद साधला. यावेळी व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांसोबत आणि खेळाडूंची संवाद साधताना त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि मागण्या जाणून घेतल्या. यावेळी खेळाडूंना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपले प्रयत्न सुरू ठेवण्याचे आश्वासन कारंडे यांनी यावेळी दिले. कारंडे यांनी अशा सार्वजनिक ठिकाणांच्या विकासासाठी आणि खेळाडूंना उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले क्रीडा व फिटनेस क्षेत्राची असलेली बांधिलकी पाहून नागरिकांनी आणि खेळाडूंनी त्यांचे स्वागत केले. यासह त्यांच्या यशस्वी भविष्यासाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या