आंबेडकर चळवळीस पाठबळ देणारे डॉ.राहुल आवाडे यांना विक्रमी मताधिक्य द्यावे मा.उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांचे आवाहन

आंबेडकर चळवळीस पाठबळ देणारे डॉ.राहुल आवाडे यांना विक्रमी मताधिक्य द्यावे मा.उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांचे आवाहन 


विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची चळवळ कोल्हापूर जिल्हयात रुजली आणि वाढली आहे. त्यासाठी आमदार व माजी मंत्री प्रकाश आवाडे यांचे योगदान मोठे आहे. आंबेडकर चळवळ मजबूत होण्यासाठी आवाडे यांनी या चळवळीतील कार्यकर्त्यांना विविध पातळीवरून मदत व सहकार्य केले आहे. त्यामुळे त्यांचे चिरंजीव तसेच महायुतीचे उमेदवार डॉ.राहूल आवाडे यांनी आंबेडकर चळवळीने पाठबळ देण्याची गरज आहे. किंबहुना आंबेडकरी चळवळ राहूल आवाडे यांना निवडून देईल असा विश्वास मा.उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांनी व्यक्त केला. 


          आंबेडकर चळवळीतील कार्यकत्यांची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी मार्गदर्शन करताना रजपुते बोलत होते. ते म्हणाले, सार्वजनिक प्रश्नावर आंबेडकर चळवळीने कोल्हापूर जिल्ह्‌यात अनेक चांगली आंदोलने केली. त्यासाठी पाठबळ देणाऱ्यात आमदार प्रकाश आवाडे यांचे मोठे योगदान आहे. त्यांचे चिरंजीव आणि महायुतीचे उमेदवार डॉ.राहूल आवाडे विधानसभा निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे राहूल आवाडे यांना आंबेडकर चळवळीने प्रचंड मतांनी विजयी करावे, असे मा.उपनगराध्यक्ष रवी रजपूते यांनी आवाहन केले. यावेळी मा.उपनगराध्यक्ष रवी रजपुते, अविनाश कांबळे, एम.के.कांबळे, के.के.कांबळे, अरुण कांबळे, अमर कांबळे, प्रमोद बेलेकर, अशोक कांबळे (आर.पी.आय.), गौतम कांबळे, पंकज कांबळे, रोहित कांबळे, सिद्धार्थ कांबळे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post