स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मदन कारंडे यांना पाठिंबा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मदन कारंडे यांना पाठिंबा 


माजी खासदार राजू शेट्टी यांनी इचलकरंजी विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार मदन सीताराम कारंडे यांना जाहीर पाठिंबा दिला. याबाबत शेट्टी यांनी इचलकरंजीसह ग्रामीण भागातील शेतकरी संघटनेला पाठींबा देण्याबाबत कळवल्या नंतर येथील संघटनानी रात्री उशिरा पाठिंबा दिला. दरम्यान, शेट्टी यांच्या पाठिंब्यामुळे महाविकास आघाडीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. इचलकरंजी व शहराला लागून असलेल्या ग्रामीण भागात शेट्टी यांची मोठी ताकद आहे. याचा येणाऱ्या विधानसभेला कारंडे यांना मोठा फायदा होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. जयकुमार कोले,बसगोंडा बिराजदार, सतिध मगदूम, संजय बेडक्याळे, बाळगोंडा पाटील, आण्णासो शहापुरे, पुरंदर पाटील, बाळासो पाटील, गणेश बागडे, धुळगोंडा पाटील, महादेव पाटील, सदाशिव मिरजे, कुबेर बेडक्याळे, रावसाहेब देवमोरे, शीतल देवमोरे, विष्णू साळुंखे, अनिकेत किनिंगे, अमन बेजुणगे, हेमंत वनकुंद्रे, गोटू कोरे, निरंजन पाटील, चिदानंद पाटील, गजानन आंबी, शीतल केटकाळे,महाणकडी देशिंगे आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post