शहापूर कृष्णानगर येथील माजी नगरसेवक इम्रान बशिर हवेरी यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांना जाहीर पाठिंबा
शहापूर कृष्णानगर येथील माजी नगरसेवक इम्रान बशिर हवेरी यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांना जाहीर पाठिंबा दिला. तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये हवेरी यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला. पाठिंबा नंतर कृष्णानगर परिसरामध्ये प्रचार रॅली काढण्यात आली. प्रचार रॅलीमध्ये कारंडे यांचा विजयाचा जयघोष केला. माजी नगरसेवक इम्रान हावेरी, महेश कोरे, सदानंद कांबळे, रियाज मुल्ला, मेहबूब मोमीन, संतोष गौंड, संतोष जाविर, मेहबूब आणुरी, रफिक बागणीवाले, इम्तियाज मुल्ला, इम्रान सोनेखान, जुबेर मुल्ला, इनुस सवदागर, केममपंना कांबळे, बशीर मोमीन, शहनुर मुल्ला आदींसह हवेरी यांना मानणारा गट व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.