बोरगाव येथे समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने मुस्लिम कब्रस्तानमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न

बोरगाव येथे समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने मुस्लिम कब्रस्तानमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न 


मानवी जीवनाला हवा पाणी याबरोबरच ऑक्सिजनची नितांत गरज आहे हे ओळखून बोरगाव येथील समस्त मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांनी कब्रस्तान या परिसरात नारळाची झाडे लावून वृक्षारोपण करण्यात आले. निपाणी शहराबरोबरच बोरगाव हे दोन नंबरचे शहर म्हणून ओळखले जाते या शहरांमध्ये मुस्लिम समाज हा मोठ्या प्रमाणात आहे,गावच्या लगतच मुस्लिम समाजाची प्रशस्त अशी कब्रस्थानची जागा आहे ,या कब्रस्तानाच्या चोहो बाजूंनी कंपाऊंड भिंत आहे.त्यासाठी परिसरात वेगवेगळी झाडे लावून शुशोभीकरण करण्याच्या उद्देश्याने आज समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने एकंदर 400 हुन अधिक नारळाची झाडे लावून वृक्षारोपण करण्यात आले, येणाऱ्या काळात या नारळाच्या वृक्षांच्या लागवडीला आपण सर्वांनी एकजुटीने पाणी घालून त्यांना वाढविण्याची गरज असल्याचे मत मुस्लिम समाज कमितीचे चेअरमन परवेझ अफराज यांनी केले, यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीने बबन मुजावर,जावेद चोकावें, व कार्यकर्त्यांकडून वृषारोपण करून झाडांना पाणी घालण्यात आले. *. वृक्षारोपण करताना समाज्याच्या वतीने फिरोझ अफराज म्हणाले की आज या धगधगत्या जीवनात प्रत्येकाला पाणी व शुद्ध ऑक्सीजन मिळवण्यासाठी वृक्ष लागवड करणे ही काळाची गरज आहे.कोरोना काळात ऑक्सीजन चे महत्त्व प्रत्येकाने ओळखले आहे. याची जाणीव ठेऊन बोरगांव येथील समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने कब्रस्थान परिसरात वृक्षारोपण करीत असल्याचे मत फिरोझ अफराज यांनी व्यक्त केले. *. या कार्यक्रमास मुस्लिम समाज कमिटीचे चेअरमन परवेज अपराज,व्हॉईस चेअरमन बबन मुजावर,सेक्रेटरी आयुब मकानदार, जावेद चोकावे, बाबासाहेब अपराज ,फिरोज अपराज, जहांगीर आफराज, निहाल आवटी, इरफान अपराज, समीर चिकोडे, शकील अपराज, रमजान मुल्ला, रहमान जमादार, मकबूल शेख, अमन चोकावे, झाकीर नदाफ, साद अपराज, सलमान अफ्राज् ,साहिल अपराज, आमिर नदाफ, सलिम शेख, सदील मुजावर,जमीर आफ्रज, इम्रान आफराज,लाडखान मोमीन, शहाबाज आफ्राझ,दस्तगीर अफराज यांच्यासह परिसरातील मुस्लिम समाजाचे नागरिक उपस्थित होते.

बोरगांवहुन अजित कांबळे.

Post a Comment

Previous Post Next Post