विकास खारगे यांची मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिवपदी पदोन्नती

विकास खारगे यांची मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिवपदी पदोन्नती 


इचलकरंजीचे सुपुत्र विकास खारगे यांची १ ऑगस्टपासून 'प्रधान सचिव' या पदावरून 'अप्पर मुख्य सचिव' या पदावर पदोन्नती झाली आहे. पदोन्नतीनंतर त्यांची पदस्थापना महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री कार्यालयातच, मुख्यमंत्र्यांचे 'अप्पर मुख्य सचिव' या पदावर केली आहे. विकास खारगे हे १९९४ च्या बॅचचे महाराष्ट्र टॉपर आयएएस अधिकारी आहेत. सकारात्मकदृष्टीकोन, अभ्यासपूर्ण निर्णय व नियमांचे पालन करून कामाचा जलदगतीने निपटारा करतात. यामुळे त्यांच्या टेबलवर प्रलंबित फाईल कधीच कोणीही पाहिली नाही. चंद्रपूरचे सहाय्यक जिल्हाधिकारी ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव हा प्रवास प्रेरणादायी व अचंबित करणारा आहे. विकास खारगे यांनी जगभरातल्या विविध देशांमध्ये राज्याचे तसेच देशाचे प्रतिनिधीत्व केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post