साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त बोरगांव येथील सुहास हिरे मनी यांच्याकडून जानकी वृद्धाश्रमात फळे फराळाचे वाटप

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त बोरगांव येथील सुहास हिरे मनी यांच्याकडून जानकी वृद्धाश्रमात फळे फराळाचे वाटप 


एक ऑगस्ट या दिवशी संपूर्ण देशात साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात येते याच अनुषंगाने बोरगाव येथील सुहास हिरेमनी यांनी एक ऑगस्ट हा आपल्या वाढदिवसानिमित्त व अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त घोसरवाड येथील जानकी वृद्धाश्रमातील निराधार गरजूंना प्रत्यक्ष भेट देऊन फळे व फराळाचे वाटप करून त्यांच्या कडून वाढदिवस साजरा करून घेतले. लोक शाहीर,साहित्यरत्न,कामगार चळवळीचे सुधारक व अखंड महाराष्ट्र मध्ये पोवाडे,शाहीरी, नाट्य कलेतून समाज घडविण्यासाठी ज्यांनी आपले आयुष्य पणाला लावले ते महर्षी ,फकिरा या कादंबरीचे लेखक आण्णा भाऊ साठे यांची काल 104 थी जयंती बोरगांव सह परिसरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. बोरगांव येथील एस.एच.फाँडेशनचे संस्थापक अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते सुहास हिरेमणी व त्यांच्या सहकाऱ्यांनी साहित्य रत्न आण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रतीमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. 1 ऑगस्ट ह्या आपल्या वाढदिवस व आण्णा भाऊ साठे यांची जयंती या संयुक्त उद्देशाने हिरेमनी यांनी घोसरवाड येथील जानकी वृद्धाश्रमातील निराधार गरजूंना प्रत्यक्ष भेट देऊन फळ,फराळाचे पदार्थ देऊन वृद्धाश्रमात वाढदिवस साजरा केला. आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष श्री बाबासाहेब पूजारी. यांनी सुहास हीरेमनी यांना व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी फाऊंडेशनचे उपाध्यक्ष योगेश कांबळे, किशोर कुरणे, अक्षय हिरेमनी, पत्रकार नितीन कुरळे,अनिल केंगारे,नरेश शिंगे,विजय गोडबोले यांच्या सह जानकी वृद्धाश्रमातील निराधार उपस्थीत होते. 

 बोरगांवहुन अजित कांबळे

Post a Comment

Previous Post Next Post