उपसा केंद्रावरील कर्मचाऱ्यांना आवश्यक साहित्याचा पुरवठा

उपसा केंद्रावरील कर्मचाऱ्यांना आवश्यक साहित्याचा पुरवठा 


कृष्णा नदीच्या पुरामुळे मजरेवाडी येथील पाणी उपसा केंद्रास तसेच पंचगंगा नदीच्या पुरामुळे पंचगंगा येथील पाणी पुरवठा योजनेच्या उपसा केंद्रास पुराचा वेढा पडला आहे. या गंभीर पुर परिस्थितीमध्ये सुद्धा शहरवासीयांना नियमितपणे पाणी पुरवठा व्हावा यासाठी महानगर पालिका पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी कार्यरत आहेत. सदर कर्मचारी पूर्णवेळ उपसा केंद्रात असल्याने त्यांना आवश्यक साहित्याचा पुरवठा बोटीतून जाऊन करण्यात आला. शहराला कृष्णा नदी मजरेवाडी येथून आणि पंचगंगा नदी मधून पाणी पुरवठा करणेत येतो. पावसामुळे सध्या पंचगंगा आणि कृष्णा या दोन्ही नद्यांना पूर आलेला आहे. तथापि या पुर परिस्थितीमध्ये पंचगंगा जॅकवेल येथे अमर गेजगे, संदीप दाशाळ, ओम यादव, नवमान किल्लेदार तसेच मजरेवाडी येथील उपसा केंद्रावर संदेश सूर्यवंशी, शुभम धुमाळ, विठल माने, यशोदीप इचलकरंजीकर, श्रीधर मगदूम, विनायक आवळे आदि महापालिकेचे कर्मचारी पुर्णवेळ तिथेच राहतात आणि तिथेच जेवण करतात. सदर कर्मचाऱ्यांना आवश्यक जीवनावश्यक साहित्याचा पुरवठा करण्याचे आदेश आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिले होते. त्यानुसार कार्यकारी अभियंता सुभाष देशपांडे, पर्यावरण अधिकारी अभय शिरोलीकर, अभियंता बाजी कांबळे,माहिती व जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे यांनी कुरुंदवाड येथून कृष्णा नदी पुरातील पाण्यातून बोटीने जाऊन उपसा केंद्रावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना आवश्यक साहित्य पोहचविले. 

Post a Comment

Previous Post Next Post