वाठार गावच्या सरपंचपदी सचिन ऊर्फ सागर कांबळे यांची बिनविरोध निवड
वाठार तर्फ वडगांव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सचिन ऊर्फ सागर आप्पासो कांबळे यांची बिनविरोध निवड झाली यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून अमित लाड होते. वाठार ता हातकणंगले येथील सरपंच सौ तेजस्विनी संतोष वाठारकर यांच्यावरती 16 ऑक्टोबर 2023 रोजी 13 विरुद्ध 1 असा अविश्वास आणला तो 25 ऑक्टोबर 2023 ला मंजूर झाला त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्याकडे विवाद अर्ज दाखल करण्यात आला होता त्यांच्या तारखा चालू होत्या तेथील निकाल 18 जून 2024 ला अविश्वास ठरावाच्या बाजूने लागला व 11 जुलै 2024 रोजी मा.जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी 26 जुलै 2024 रोजी सरपंच निवड घेण्याचा आदेश केला त्यानंतर सौ.तेजस्विनी संतोष वाठारकर यांनी हायकोर्टात अपील दाखल केली परुंतु त्या ठिकाणी एकाच तारखेत त्याचा अपील फेटाळण्यात आला तेथे सुनावणी झाली व तेथे सुद्धा अविश्वास ठरावाच्या बाजूने बुधवार 25 जुलै 2024 रोजी निकाल लागला त्यानंतर सरपंच निवडणुकीसाठी आज दि 26 रोजी प्रशासनाच्या वतीने सरपंच निवडणूक लावण्यात आली होती यावेळी वाठार ग्रामपंचायत मध्ये अनुसूचित जातीचे सौ नाजुका राजहंस भूजिंगे व सचिन ऊर्फ सागरआप्पासो कांबळे असे दोन उमेदवार होते परुंतु सौ भुजिंगे यांनी सरपंच निवडणूकित अर्ज न भरता सचिन ऊर्फ सागर आप्पासो कांबळे यांना पाठिंबा दिला त्यामुळे सरपंच निवडी साठी सचिन ऊर्फ सागर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्याची ग्रामपंचायत मध्ये आज दुपारी बिनविरोध निवड करण्यात आली या निवडणूक प्रक्रियेवेळी ग्रामविकास अधिकारी डी डी शिंदे,उपसरपंच गजेंद्र माळी, ग्रा.पं सदस्य सुहास पाटील, महेश कुंभार, सचिन कुंभार, राहुल पोवार, महेश शिर्के, सुरेखा मस्के, आश्विनी कुंभार, सुशीला चौगुले, सुजाता मगदूम, रुकसाना नदाफ, रेश्मा शिंदे यांच्यासह संत गोरोबा काका पॅनलचे प्रमुख नानासो मस्के सर, जय हनुमान युवा शक्ती पॅनलचे प्रमुख महेंद्र शिंदे, उज्वल ध्येय युथ फाऊंडेशनचे युवा उधोजक शरद बेनाडे, साहेबप्रेमी गटाचे बी एस पाटील, तौसीफ शेख, सूर्यकांत शिर्के, सुरेश नरके,दिलीप भाटे, महेश महाराज, पत्रकार प्रकाश कांबळे,अभिजित सुतार, सुगंध कांबळे, राजहंस भूजिंगे, सूरज नदाफ, संदीप चौगुले, गोविंदा शिंदे, संजय मगदूम, शरद कांबळे, भूपाल कांबळे, संजीव जाधव, विलास मस्के यांच्यासह गावातील अनेक नागरिक व गावातील अनेक तरुण उपस्थित होते सरपंच निवड होताच गावातून गुलालाची उधळण करत व डॉल्बीच्या आवजात तसेच फटाक्यांची आतिषबाजी करीत मिरवणूक काढण्यात आली
वसुंधरा शक्ती न्यूजसाठी - वाठारहून किशोर जासूद