बेळगांव जिल्हाधिकारी कार्यालयावर वीज बिल माफ करण्यासाठी विनकरांचे धरणे आंदोलन ; सीमाभागातील यंत्रमाग धारकांचा आंदोलनात सहभाग

बेळगांव जिल्हाधिकारी कार्यालयावर वीज बिल माफ करण्यासाठी विनकरांचे धरणे आंदोलन ; सीमाभागातील यंत्रमाग धारकांचा आंदोलनात सहभाग 


कर्नाटक सरकारच्या पावसाळी अधिवेशनात यंत्रमाग धारकांची वीज बिले माफ करण्यात यावे या मागणीसाठी जिल्ह्यातील विनकरा कडून बेळगांव जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात आले. बेळगांव येथे निषेध मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालय वर पोहोचलेल्या यंत्रमाग धारकांनी थकबाकीचे बिल भरणार नाही अशा घोषणा देत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. शासनाने विजेच्या दरात वाढ केल्याने विजेवर चालणारे यंत्र माग विनकर यांचे जगणे मुश्किल झाले आहे. हेस्काम कडून थकित बिलासाठी आठ ते दहा लाख रुपये ची मागणी केली जात आहे, पण विणकर हे बिल भरण्यास असमर्थ आहेत, वस्त्रोद्योग मंत्र्यांनी विणकर यांच्या प्रश्नाबाबत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पटवून हा मुद्दा सभागृहात मांडावा. विणकारांचे वीज बिल माफ करावे. कर्जाचा बोज्या सहन न झाल्याने राज्यात आजवर आतापर्यंत 51 विनकारांनी आत्महत्या केल्या आहेत मात्र वस्त्रोद्योगमंत्री, मुख्यमंत्री यांनी त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी कधीही प्रयत्न केलेले नाहीत किंवा आलेले नाहीत. कर्नाटक विणकर सेवा संघाचे शिवलिंग तिरकी यांनी विनकारांच्या वीज बिल माफीवर सभागृहात चर्चा होई पर्यंत बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांसमोर धरणी सत्याग्रह धरण्याचा इशारा दिला. सरकारला यंत्रमाग कामगारांच्या मागण्या लक्ष्यात घेणे गरजेचे आहे.सरकारला निवडणूकीत दिलेल्या आश्वासनाचां विसर पडला आहे. एकीकडे वीज बिल माफ करण्याचा प्रयत्न केला जात आहे,तर पंधरा ते वीस दिवसात बिल न भरल्यास चालु वरचे कनेक्शन तोडण्याचा प्रयत्न करतात, विणकारांचा प्रश्नसोडवण्यासाठी जिल्हा पालकमंत्र्यांनी आवाज उठवावा अशी मागणी बेळगाव जिल्ह्यातील मानकापूर विणकर संघाचे अध्यक्ष अर्जुन कुंभार यांनी केले  यावेळी या आंदोलनांमध्ये बेळगाव जिल्ह्यातील मानकापूर बोरगाव, ढोणेवाडी, निपाणी बागलकोट आदी भागातील विणकर उपस्थित होते. 

वसुंधरा शक्ती न्यूजसाठी बोरगांवहुन अजित कांबळे

Post a Comment

Previous Post Next Post