बदलत्या परिस्थितीत विद्यार्थ्यानी उन्नत शिक्षणाला प्राधान्य द्यावे ; नासिर बोरसादवाला यांचे मत

बदलत्या परिस्थितीत विद्यार्थ्यानी उन्नत शिक्षणाला प्राधान्य द्यावे ; नासिर बोरसादवाला यांचे मत 


बोरगांव येथील के.एस.पाटील माध्यमिक शाळेत स्मार्ट क्लासचा उद्घाटन सोहळा संपन्न.

चांगले संस्कार व उन्नत,शिक्षण देणारा अविभाज्य घटक म्हणजे शाळा. शाळा ही पवित्र जागा आहे याचे पावित्र्य राखणे ही सर्वांची जबाबदारी आहे. आज शिक्षण क्षेत्रात मोठी स्पर्धा आहे .पण गुणात्मक बदल, यशाची परंपरा जपण्यासाठी शिक्षकाचे पात्र महत्वाचे आहे, त्यासाठी गुणात्मक शाळा व चांगले शिक्षकांमुळेच विद्यार्थी हा सर्व गुण संपन्न बनतो. त्यासाठी विद्यार्थ्यांनी बदलत्या परिस्थितीत गुणात्मक शिक्षणाला प्राधान्य द्यावे असे मत इचलकरंजी रोटरी क्लबचे गव्हर्नर नासिर बोरसादवाला यांनी व्यक्त केले. ते बोरगांव येथील के.एस.पाटिल माध्यमिक शाळेला रोटरी क्लबच्या माध्यमातून देण्यात आलेल्या अर्थसहाय्य मधून दिलेल्या स्मार्ट क्लासचे उद्घाटन प्रसंगी बोलतं होते. अध्यक्षस्थानी शिक्षणं संघाचे चेअरमन श्री आर .बी.पाटिल होते. कार्यक्रमाची सुरवात शालेय विद्यार्थ्यांकडून प्रार्थना गीताने करण्यात आली.स्वागत व प्रास्ताविक चेअरमन श्री.आर.बी.पाटिल यांनी केले. प्रारंभी के.एस.पाटिल हायस्कूलला रोटरी क्लब ऑफ इचलकरांजी एक्झिक्युटिव्ह यांच्या वतीने देण्यात आलेल्या सव्वा दोन लाख रुपयांच्या सहाय्य निधीतून तीस स्मार्ट बेंचीस व पंच्याहत्तर इंची डिजिटल पॅनल म्हणजे स्मार्ट टीव्ही यांचे उद्घाटन फीत कापून रोटरी क्लबचे गवर्नर नासीर बोरसादवाला व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचां शिक्षणं संघाच्या वतीने यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी रोटरी क्लबचे सेक्रेटरी शितल उपाध्ये, श्री.रवि आडूके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी अरुण भंडारे, रवी अबुकिया, संजय मेटे, शितल उपाध्ये,राजेश कोडूस्कर, गिरीश कुलकर्णी, संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, व्हॉईस चेअरमन मनोज पाटील, एस.टी.लगारे, डॉ संजय पाटील, अशोक अंमनावर, के.एस.पाटिल हायस्कूलचे मुख्याध्यापक ए.ए.धुळासावंत, ए.बी.पाटिल कन्नड माध्यम शाळेचे मुख्याध्यापक ए.डी.हवले यांच्यासह, शिक्षक, शिक्षिका वर्ग, विद्यार्थ्या उपस्थित होते. सूत्रसंचलन पी.ए.खोत यांनी केले तर आभार पी.ए.चौगुले यांनी मानले. 

वसुंधरा शक्ती न्यूजसाठी बोरगांवहुन अजित कांबळे.

Post a Comment

Previous Post Next Post