बेंगलोर मधील जी.टी.वर्ल्ड मॉलमध्ये धोतर नेसलेल्या शेतकऱ्याला प्रवेश नाकारला ; संबधित मॉल 7 दिवस बंद ठेवण्याचे दिले आदेश

बेंगलोर मधील जी.टी.वर्ल्ड मॉलमध्ये धोतर नेसलेल्या शेतकऱ्याला प्रवेश नाकारला ; संबधित मॉल 7 दिवस बंद ठेवण्याचे दिले आदेश 


कर्नाटकची राजधानी असलेल्या बेंगलोर येथे एका शेतकऱ्याला त्याच्या कपड्यांमुळे आत जाण्यापासून रोखणाऱ्या मॉलवर कर्नाटक सरकारने कडक कारवाई केली असून हा मॉल सात दिवस तत्काळ बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 16 जुलै 2024 रोजी हावेरी जिल्ह्यातील फकीरप्पा हा वृद्ध शेतकरी पत्नी व मुलासोबत मंगळवारी जीटी वर्ल्ड मॉलमधील मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट पाहण्यासाठी आला होता. या वृद्धाचा मुलगा बंगळुरूमध्ये शिक्षण घेत असून त्याने आपल्या आई-वडिलांना मॉल दाखवायला आणले होते. मात्र, पांढरा शर्ट व राज्याचा पारंपरिक पोशाख धोतर परिधान केलेल्या फकीरप्पा यांना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी गेटवरच रोखले. कथितरीत्या त्यांना सांगण्यात आले की, ते धोतर घालून आत जाऊ शकत नाहीत, त्यांनी पँट घालून यावे. सरकारने शेतकऱ्याचा अपमान म्हणजे प्रतिष्ठेवर व स्वाभिमानावर हल्ला असल्याचे म्हटले आहे. हे खपवून घेतले जाणार नाही त्यासाठी. कर्नाटक सरकारने नामवंत अध्या जी टी वर्ल्ड मॉल सेंटर तात्काळ बंद करून 7 दिवस मॉल बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारतीय संविधानाने सर्वांना समानतेचा अधिकार दिलेला आहे याउलट अजूनही अश्या असमानतेच्या घटना घडत आहेत.सरकारने मॉल वर कारवाई केल्यामुळे शासनाचे समाधान व्यक्त केले जात आहे.

वसुंधरा शक्ती न्यूजसाठी बोरगांवहुन अजित कांबळे

Post a Comment

Previous Post Next Post