महाराष्ट्र नवनिर्माण कामगारसेनेच्यावतीने बांधकाम कामगारांना संसार उपयोगी गृह वस्तू संचाचे वाटप

महाराष्ट्र नवनिर्माण कामगारसेनेच्यावतीने बांधकाम कामगारांना संसार उपयोगी गृह वस्तू संचाचे वाटप 


इचलकरंजी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या वतीने नोंदीत बांधकाम कामगारांना संसार उपयोगी गृह वस्तू संचाचे वाटप इचलकरंजी शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेना कार्यालय येथे करण्यात आले. सदरचे वाटप मनसे कामगार सेनेचे कोल्हापूर जिल्हा चिटणीस महेश शेंडे यांच्या नेतृत्वाखाली योजनेचे लाभ देण्यात आले. यावेळी शहर अध्यक्ष रवी गोंदकर, मनोहर जोशी, शहाजी भोसले, दिपक पोवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी शहर अध्यक्ष रवी गोंदकर म्हणाले की इचलकरंजी शहर व परिसरातील बांधकाम क्षेत्रासह इतर क्षेत्रातील कष्टकरी कामगारांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी मनसे कामगार सेनेच्या पाठीशी ठामपणे उभे रहावून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले या कार्यक्रमास राहुल दवडते, राजू माळी, मारूती वंजिरे, किरण माळी, विरू माळी, आरून माळी, प्रतिक सांवत, गजानन गोधडे आदिंसह मनसे कार्यकर्ते व लाभार्थी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post