घरफाळा सवलत मुदतवाढ द्या,वीजचोरीप्रकरणी कारवाई करा ; इनामचे उपायुक्तांना निवेदन

घरफाळा सवलत मुदतवाढ द्या,वीजचोरीप्रकरणी कारवाई करा ; इनामचे उपायुक्तांना निवेदन 


इचलकरंजी शहरातील मिळकत धारकांना घरफाळा बिले अजून मिळालेली नाहीत त्यांना ती मिळाल्यानंतर १ महिना सवलतीचा लाभ घेण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी इचलकरंजी नागरिक मंचच्या शिष्टमंडळाने उपायुक्त सोमनाथ आढाव यांच्याकडे केली यावर आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. वखारभाग येथील कब्रस्तान मध्ये महापालिकेच्या पोलवरून बेकायदेशीर रित्या आकडे टाकुन विजजोडणी घेतली व त्यामध्ये युवकाचा शॉक लागून मृत्यू झाला यामध्ये संबंधितांवर विजचोरीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली त्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल असे आढाव यांनी सांगितले. याचबरोबर सावली सोसायटी ते गणेशनगर हा रस्ता पॅचवर्क करण्याबाबत आज तिसऱ्यांदा निवेदन देत आहोत तरीही कारवाई का होत नाही,याबाबत तातडीने त्यांनी पॅचवर्क करण्याच्या सूचना दिल्या. इचलकरंजी शहरातील स्वच्छतेचा बोजवारा उडाला असून भागाभागात कचऱ्याचे ढिग आहेत,दुर्गंधी सुटलेली असून यावर उपाययोजना करण्याचे काम सुरू आहे लवकरच नविन टेंडर काढत असल्याचे त्यांनी सांगितले.डेंग्यू मलेरिया बाबत मोठ्या प्रमाणात पाणीसाठे तपासण्या सुरू आहेत व त्याबाबत प्रशासन दक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. घरफाळा सवलतीबाबत कर अधीक्षक अरिफा नुलकर यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी नियमानुसार दुसऱ्या सहामाहीच्या बिलात सवलत देण्यात येत असून निवडणूक व सॉफ्टवेअर अद्ययावत करण्यासाठी वेळ लागल्याने बिले वेळेत देता आली नाहीत परंतु वेबसाईटवर बिले उपलब्ध आहेत. सवलतीच्या मुदतवाढीसाठी आयुक्त साहेब निर्णय घेतील असे सांगितले. यावेळी इचलकरंजी नागरिकमंचचे अमोल ढवळे, उदयसिंह निंबाळकर, राजु कोन्नुर, महेंद्र जाधव,संजय डाके, जतीन पोतदार, दीपक पंडित, अभिजित पटवा उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post