ढोणेवाडी-कारदगा परिसरातील यंत्रमागधारकांचा वाढीव वीजबिलसाठी एल्गार

ढोणेवाडी-कारदगा परिसरातील यंत्रमागधारकांचा वाढीव वीजबिलसाठी एल्गार 



कर्नाटक राज्य सरकारने दहा एचपीसाठी मोफत वीज दिली आहे. पण थकीत बिले माफ न करता पुन्हा यंत्रमाग धारकांना बील भरण्याची नोटीस येत आहेत. त्यामुळे संतप्त यंत्रमाग धारक मोर्चा काढुनी भोज हेस्काॅमला निवेदन देवून भरणार नाही भरणार नाही वाढीव वीज बिल भरणार नाही असा एल्गार केला आहे. त्यामुळे शासनाने या समस्येकडे लक्ष न दिल्यास वातावरण तापण्याची शक्यता आहे. सध्या यंत्रमाग व्यवसाय आर्थिक संकटात सापडला असून यंत्रमाग व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. ढोणेवाडी कारदगा येथील चारशे कुटुंब यंत्रमाग व्यवसायात उतरुन आपल्या कुटुंबाचा गाडा चालविला आहेत. प्रति युनिट ९.७५ पैसे दर अकारुन यंमाग व्यवसायाला उतरती कळा हेस्कॉमने आणली होती.  यंत्रमाग संघटनेच्या माध्यमातून मुख्यमंत्री व वस्त्रोद्योग मंत्री व खात्यात कडे पाठपुरावा केल्यानंतर मार्च २०२४ पासून कर्नाटक राज्य सरकारने 10 एचपीसाठी मोफत विज पुरवठा दूवुन व्यवसायाला ऊर्जितावस्था आणली आहे. गेल्या चौदा महिन्याचे थकीत वाढीव वीज बिले माफ करण्यासाठी संघटना कार्यरत असताना पुन्हा जून महिन्यात थकित वाढीव बिल भरण्याची नोटीस  हेस्कॉमने काढुन कनेक्शन कट करण्याचा आदेश दिला आहे.त्यामुळे यंत्रमाग धारकाना दुष्काळात तेरावा महिना आठवत आहे. यावेळी बोलताना भीमराव खोत म्हणाले म्हणाले की राज्य सरकारने वाढीव वीज माफ करण्यासाठी राज्य अध्यक्ष शिवलिंग टिरकी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू असुन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना निवेदन दिले आहे. सध्या मिटरला २ रुपये ४३पैसे मजुरी असुन खर्च मात्र ३ रुपये ६३ पैसे येत आहे. ५२ पिकाला ५पैसे ऐवजी ७ पैसे मजुरी मिळाल्यानंतर हा व्यवसाय टिकणार आहे. नाहीतर वाढीव विज बिले व जाचक अटींमुळे हा व्यवसाय डबघाईस जाणार आहे तरी शासनाने वाढीव थकीत बील करुन यंत्रमाग व्यवसायास उर्जितस्थेत आणावे असे म्हणाले. त्यानंतर सद्गुरू आप्पा महाराज मठापासून मोर्चा काढुन भोज हेस्काॅमला  महालक्ष्मी यंत्रमाग सोसायटीच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी आण्णासाहेब नागराळे, सोमनाथ परकाळे, बाळासाहेब लायकर, बाबासाहेब हंडे, दादासो खामकर, संतोष संकपळ, राजु बेनाडे, मारुती संकपळ, राहुल घाटगे, सतीश नागराळे आदी मान्यवर व यंत्रमागधारक उपस्थित होते.

वसुंधरा शक्ती न्यूजसाठी बोरगावहुन अजित कांबळे

Post a Comment

Previous Post Next Post