इचलकरंजीत पंचगंगा नदी पुर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जागतिक बँकेच्या प्रतिनिधींची भेट

इचलकरंजीत पंचगंगा नदी पुर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जागतिक बँकेच्या प्रतिनिधींची भेट 


महाराष्ट्र पुर नियंत्रण विकास कार्यक्रम अंतर्गत इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने सविस्तर प्रकल्प अहवाल करण्याचे काम प्रगतीत आहे. याबाबत तांत्रिक सामाजिक आर्थिक बाबी तपासणी व मार्गदर्शन करण्यासाठी वर्ल्ड बँकेच्या  जोलांता क्रिप्सीन वॉशिंग्टन, शिना अरोरा,जार्क गॉल पॅरिस , रुनिता चौधरी , देविका पानसे, अतुल खुराणा, निखिल पांगम, पृथ्वीराज  राजुकोन यांच्या शिष्टमंडळाने आज बुधवार दि.२६ जून रोजी इचलकरंजी शहरास भेट दिली. प्रथममहानगरपालिका कार्यालयात आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी सर्व प्रतिनिधींचे नॅपकीन बुके देवुन स्वागत केले.या अनुषंगाने आयुक्त यांचे दालनात झालेल्या बैठकीत इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने  पी.पी.टी.च्या माध्यमातून स्लाईड शोद्वारे सादरीकरण करण्यात आले.या शिष्टमंडळास पूर परिस्थितीमध्ये जलमय होणारा नागरी भाग तसेच सन २०१९ व २०२१ या वर्षामध्ये जलमय झालेल्या इचलकरंजी शहराचे व्हिडिओ चित्रीकरणाचे सादरीकरण करणेत आले. त्याचबरोबर पुराच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला पूर परिस्थितीत कारणीभूत असणाऱ्या सर्व बाबींची माहिती घेण्यात आली तसेच पूर टाळण्या करिता करणेत येण्यासारख्या उपाययोजनां बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. पूर परिस्थितीमध्ये बाधित होणाऱ्या शहरातील नदी घाट, शेळके मळा, टाकवडे वेस, शहापूर खण या भागास शिष्टमंडळाने भेट देऊन पाहणी केली. शहराची भौगोलिक रचना नाले, नदी यांचे प्रवाह व सद्यस्थिती जाणून घेतली शहरातील उपलब्ध पाणीपुरवठा, पाण्याचे स्त्रोत, निर्माण होणारे सांडपाणी, सांडपाणी प्रकल्प, भविष्यात पाणी व सांडपाणी याची उपलब्धता व प्रक्रिया याबाबत सविस्तर चर्चा झाली.सायंकाळी झालेल्या समारोपाच्या सत्रात निसर्गावर आधारित उपाय योजना यावर चर्चा झाली.निसर्गाचा समतोल राखुन विकास उपाय योजना करणे बाबतच्या सुचना यावेळी शिष्टमंडळाने केल्या. तसेच संपूर्ण जगात पुर नियंत्रणाच्या पाश्र्वभूमीवर करणेत येत असलेल्या विविध उपाययोजनांचे सादरीकरण जागतिक बँकेच्या मुख्य कार्यालय येथून व्हि.सी.द्वारे करणेत आले. त्याचबरोबर इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने तयार करणेत आलेल्या आपत्ती व्यवस्थापन कृती आराखड्याचे प्रकाशन जागतिक बँक आपत्ती नियंत्रण समितीचे सदस्यांचे हस्ते करणेत आले. याप्रसंगी उपायुक्त स्मृती पाटील, सोमनाथ आढाव, सहा.आयुक्त विजय राजापुरे, शहर अभियंता महेंद्र क्षिरसागर, कार्यकारी अभियंता सुभाष देशपांडे, मुख्य वित्त व लेखा अधिकारी विकास खोळपे, मुख्य लेखा परीक्षक आरती खोत, आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार, सहा.संचालक नगररचना प्रशांत भोसले, संगणक अभियंता संतोष पवार, पाणी पुरवठा अभियंता बाजी कांबळे,अभय शिरोलीकर आदि उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post