इचलकरंजी महानगरपालिका ऑफ लिव्हिंग, गुरुप्रसाद योग परिषद आणि पतंजली योग समिती यांच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

इचलकरंजी महानगरपालिका ऑफ लिव्हिंग, गुरुप्रसाद योग परिषद आणि पतंजली योग समिती यांच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा


    

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज शुक्रवार दि.२१ जून रोजी इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आर्ट ऑफ लिव्हिंग इचलकरंजी, कोल्हापूर जिल्हा गुरुप्रसाद योग परिषद इचलकरंजी आणि पतंजली योग समिती इचलकरंजी यांच्या सहकार्याने महानगरपालिकेच्या राजारामस्टे डियम येथे योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करणेत आला. 


यामध्ये कोल्हापूर जिल्हा गुरुप्रसाद योग परिषद, इचलकरंजीचे प्रशिक्षक सुहास पवळे तसेच आर्ट ऑफ लिव्हिंगचे वरिष्ठ प्रशिक्षक विनायक मुरदुंडे    आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी योग, प्राणायाम,  ध्यान इत्यादी बाबींची प्रात्यक्षिके सादर केली. 


         योग,प्राणायाम, ध्यान यामुळे तणावमुक्त जीवन जगण्यास मदत होते त्याच बरोबर निरोगी आयुष्यासाठी योगाचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याने महानगरपालिकेच्या आवाहना नुसार शहरवासीयांनी त्याच बरोबरच महानगरपालिका रा.छ.शाहू हायस्कूल, डि.के.ए.एस.सी. महाविद्यालय, गर्ल्स हायस्कूल, बापुजी साळुंखे हायस्कूल, मुसळे हायस्कूल, डि.के.टी.ई.नारायण मळा, महानगरपालिका रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतन शाळा, उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांनी राजाराम स्टेडियम येथे मोठ्या संख्येने सहभाग घेतला. याप्रसंगी आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी लोकांनी आपणांस मदत करणाऱ्या सर्वांचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त करावी असे आवाहन केले. आजच्या या कार्यक्रमासाठी आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, उपायुक्त प्रसाद काटकर, अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने, कामगार अधिकारी विजय राजापुरे, क्रिडा अधिकारी संजय शेटे, रा.छ.शाहू हायस्कूल मुख्याध्यापक शंकर पोवार, उद्योजक शामसुंदर मर्दा, अग्निशमन अधिकारी सौरभ साळुंखे, राहुल पोटे प्रा.संतोषी जावीर, प्रा.विनायक भोई, प्रा.ए.एस.मुलाणी तसेच आर्ट ऑफ लिव्हिंग इचलकरंजी, कोल्हापूर जिल्हा गुरुप्रसाद योग परिषद इचलकरंजी आणि पतंजली योग समिती इचलकरंजी यांचे प्रतिनिधी यांचेसह विविध मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post