इचलकरंजी एस.टी आगाराच्यावतीने पास सवलतींसह अनेक सवलतीच्या योजनांचा शाळांमध्ये केला जागर

इचलकरंजी एस.टी आगाराच्यावतीने पास सवलतींसह अनेक सवलतीच्या योजनांचा शाळांमध्ये केला जागर 


 


शाळा सुरू झाल्या की विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्ती, सवलतींची माहिती दिली जाते. आतापर्यंत मात्र शाळा आणि विद्यार्थी एस.टी.महामंडळाच्या विविध सवलतीच्या योजनांपासून दूरच राहिले आहेत. त्यामुळे यंदा इचलकरंजी एसटी आगाराच्या वतीने पास सवलतींसह अनेक सवलतीच्या योजनांचा शाळांमध्ये जागर केला जात आहे. यातून नानाविध प्रवासाच्या योजना समजू लागल्या असून यापुढे विद्यार्थ्यांच्या ‘शैक्षणिक प्रवासाला एसटी’चे बळ मिळणार आहे.शाळा सुरू झाली की ग्रामीण भागातून शहरात येणारे शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मासिक पाससाठी गर्दी होत असते. इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत अहिल्याबाई होळकर ही विद्यार्थ्यांसाठी मोफत पास योजना असल्याने यालाही प्रतिसाद चांगला मिळतो. या पलिकडे जाऊन विद्यार्थी आणि शाळांपर्यंत एसटी महामंडळाच्या इतर प्रवासाच्या सवलतींची माहिती पोहचली नव्हती आणि विद्यार्थ्यांनीही त्याबाबत अधिक जाणण्याचा प्रयत्नही केला नाही. यावर्षी याची गांभीर्याने नोंद घेत इचलकरंजी एसटी आगाराच्या वतीने शाळा - महाविद्यालयात विविध पास व सवलतींचा जागर केला जात आहे.आगारप्रमुख सागर पाटील यांच्यासह इतर कर्मचारी शैक्षणिक संस्थांमध्ये जावून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे देण्यात येणार्‍या विविध शालेय पास व सवलतींच्या लाभांविषयी माहिती देत आहेत. नियमित विद्यार्थ्यांना मासिक पास व अहिल्याबाई होळकर योजनेतून विद्यार्थिनींना मोफत पास शाळेतच मुलांच्या हाती देण्याची सोय उपलब्ध केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post