महाराष्ट्र कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा

महाराष्ट्र कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

महाराष्ट्र कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष व कामगार नेते मा.श्री.राजेंद्र निकम यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील सर्वच महाराष्ट्र बांधकाम कामगार सेना व महाराष्ट्र कामगार सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी ग्रामीण भागामध्ये वाढदिवसानिमित्त दहावी व बारावी मधील विद्यार्थ्यांचा सत्कार करून सदरच्या विद्यार्थ्यांना वही पेन व शालेय साहित्य वाटप करण्यात आले तसेच सकाळी अकरा वाजता महाराष्ट्र कामगार सेना कार्यालय येथे केक कापून व पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या व दहावी व बारावी मधील विद्यार्थ्यांचा सत्कार करून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले तसेच दुपारी एक वाजता लिंबू चौक येथे समाधान वृद्धाश्रमातील वृद्धांना धान्य वाटप करण्यात आले तसेच सायंकाळी चार वाजता ग्रामीण मधील सर्व पदाधिकारी यांनी संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तसेच सायंकाळी सहा वाजता शहापूर येथे महिला आघाडीच्या वतीने केक कापून व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व शहापूर मधील दहावी व बारावी मधील सर्व उद्योगातील कामगारांच्या मुलांनी चांगले गुण मिळवून पास झाल्याबद्दल सदरच्या विद्यार्थ्यांचा व विद्यार्थिनीचा सत्कार करून वही पेन व शाळेचे साहित्य वाटप करण्यात आले तसेच मनसेचे सहकार सेनेचे राज्य उपाध्यक्ष पुंडलिक भाऊ जाधव, महाराष्ट्र कामगार सेना जिल्हा संघटक सद्दाम मुजावर, जिल्हा उपाध्यक्ष बादल हेगडे, तालुकाध्यक्ष इम्तियाज शेख, उपाध्यक्ष शहानवाज चांदकोटी, शहर सचिव अल्ताफ नायकवडे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष बेगम नदाफ, जिल्हा उपाध्यक्ष सलमा शेख, तालुकाध्यक्ष पूजा पवार, शहराध्यक्ष सुवर्णा शिंदे यांच्या हस्ते केक कापण्यात आला शहापूर येथे महिला आघाडीच्या गाव अध्यक्ष सुमित्रा टोणे यांच्या हस्ते केक कापून पुष्पगुच्छ देऊन दहावी व बारावी मधील गुणवंत मुलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बाबू पुजारी, दस्तगीर मुजावर, महिला आघाडीच्या अध्यक्षा हेमा कांबळे, पांडुरंग माने, केप्पाण्णा हलगेकर, अनिल अस्वले, राजेश मोरे, सुभाष इंगळे, डांगे, राजलक्ष्मी गुरव, चंद्रकांत शिंदे आदींसह पदाधिकारी व कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post