चिकोडी लोकसभेचा निकाल 22 फेऱ्यानी लागणार ; निवडणुक अधिकारी राहुल शिंदे
चिकोडी लोकसभा मतदार संघाची मतमोजणी दिनांक चार जून रोजी सकाळी आठ वाजल्यापासून चिकोडी येथील आरडी महाविद्यालयात 22 फेऱ्यांमध्ये होत असल्याची माहिती चिकोडी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी राहुल शिंदे यांनी दिले. चिकोडी शहरातील आरडी महाविद्यालय मतमोजणी केंद्रात पार पडलेल्या पत्रकार परिषदेचे ते बोलत होते. पुढे बोलताना राहुल शिंदे म्हणाले की चार जून रोजी स्ट्रॉंग रूम मधून बाहेर पडून सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल, त्यानंतर साडेआठ वाजता इविम मशीन मतमोजणी सुरू होणार आहे. लोकसभेची मतमोजणी एकूण 22 फेऱ्यांमध्ये होत असून त्यासाठी 112 टेबल मांडण्यात आले आहेत. प्रत्येक मतमोजणी खोलीमध्ये 12 टेबल ची व्यवस्था करण्यात आली असून तसेच पोस्टल मतमोजणी साठी 16 टेबल व ई टी बी एस मतांची मतमोजणी दोन खोलीमध्ये होणार आहे. मतांची मोजणी 16 टेबलवर होत असून त्यासाठी स्कॅनिंग व मतमोजणी करण्यासाठी दोन रूमची व्यवस्था करण्यात आली आहे, एकूण ४७२२ पोस्टल मतांचे मतमोजणी सुद्धा यावेळी होईल. इव्हीएम मशीन मोजणीसाठी आठ खोल्यांची व्यवस्था करण्यात आली असून 112 टेबल मांडण्यात आले आहेत. एकंदर मतमोजणी केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलिस बंदोबस्त करण्यात आलेला आहे. सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन निवडणुक अधिकारी राहुल शिंदे यांनी केले.
वसुंधरा शक्ती न्यूजसाठी बोरगांवहून अजित कांबळे