कोरोची ग्रामपंचायत उपसरपंच पदी पूजा नागनाथ टेळे यांची निवड
गटांतर्गत याप्रमाणे उपसरपंच विकी माने यांनी पदाचा राजीनामा दिल्याने उपसरपंच पद रिकामे झाले होते.म्हणून ग्रामपंचायत कार्यालयाचे उपसरपंच निवड प्रक्रिया पार पडली याच्या अध्यक्षस्थानी सरपंच डॉ. संतोष भोरे होते.ग्रामपंचायत मध्ये भाजप 4, ताराराणी विकास आघाडी 4, अपक्ष 2, व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना गटाचे सरपंच 1 यांच्या आघाडीची सत्ता आहे उपसरपंच पदासाठी सरपंच वगळता उर्वरित दहा सदस्यां मध्ये चिठ्ठी टाकून उपसरपंच निवडण्याचे ठरले होते. त्यानुसार नेत्याच्या कार्यालयात चिठ्ठी टाकण्यात आली यामध्ये पूजा टेळे यांचे नाव आले.विरोधी गटातर्फे कोमल कांबळे यांनी अर्ज दाखल केला होता. त्यानुसार गोपनीय मतदान घेण्यात आले यावेळी पूजा टिळे यांना 10 मते मिळाली व कोमल कांबळे यांना 7 मते मिळाली यामुळे पूजा टेळे यांच्या गळ्यात उपसरपंच पदाची माळ पडली. यावेळी कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत अनुदोत्सव साजरा केला. उपसरपंच पदी पूजा टिळे यांची निवड झाल्याबद्दल सरपंच डॉ. संतोष भोरे व ग्रामपंचायत सदस्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी ग्रामविकास अधिकारी आनंत गडदे, पंचायत सदस्य शितल पाटील, विकी माने, संजय शहापुरे, सतीश सूर्यवंशी, राजगोंडा चावरे, साहेबलाल शेख, आनंद लोहार, स्नेहल कोरोचीकर, हलीमा सनदी, संगीता मगदूम, अश्विनी चव्हाण, आनंदी आमते, आरती कुंभार, पोलीस पाटील सावकर हेगडे, तंटामुक्त अध्यक्ष नितीन चौगुले यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वसुंधरा शक्ती न्यूजसाठी कोरोचीहून अमित काकडे