शैक्षणिक कामासाठी शासकीय दाखले वेळेत मिळुन मुलांचे होणारे आर्थिक नुकसान थांबवे पै.अमृत भोसले यांचे प्रांताधिकारी यांना निवेदन
शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने नवीन शाळा प्रवेशासाठी उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, EWS दाखला, रहिवासी दाखला, नॉन क्रिमिलिअर दाखला अशा विविध दाखल्यांची आवश्यकता असते. लोकसभा निवडणूकीमुळे हि दाखले मिळण्यास विलंब झालेला आहे. सदर दाखल वेळेत न मिळाल्याने विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित रहावे लागत आहे. त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, प्रवेश मिळण्यास अडचणी येऊ नयेत, सर्व प्रकारची दाखले वेळेत मिळावी यासाठी उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) यांनी भाजपा शहराध्यक्ष पै.अमृतमामा भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली शिष्टमंडळाने निवेदन देण्यात आले.यावेळी सरचिटणीस उत्तम चव्हाण, राजेश रजपुते, महिला अध्यक्षा सौ.अश्विनी कुबडगे, सौ.नीता भोसले, अनुसूचित जाती जमाती महिला अध्यक्षा सौ. नागुबाई लोंढे, उपाध्यक्ष दिपक पाटील, उमाकांत दाभोळे, अनिस म्हालदार, प्रदिप मळगे, अमित जावळे ज्येष्ठ नागरिक आघाडी अध्यक्ष दिपक कडोलकर, संजय गेजगे, अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष अलिहुसेन खान, अर्जुन सुतार, मारुती पाथरवड, प्रविण पाटील, म्हाळसाकांत कवडे, मनोज जाधव, मोहन कुंभार, अरुण कुंभार, मनोज तराळ, महेश पाटील, जिलानी टाकवडे, वसंत पवार, अशोक पुरोहित उत्तम विभुते अंकुश पोळ आदि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.