पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी शपथ घेतल्याबद्दल बोरगावत भाजप कार्यकर्त्याकडून जल्लोष
देशाच्या अठरावी लोकसभा निवडणुक नुकतीच संपन्न झाली, यामध्ये भाजप प्रणित एनडीए आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे, या विजयाच्या पार्श्वभूमीवर लोकप्रिय नरेंद्र मोदी यांनी काल तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधान पदाची शपथ घेऊन हॅट्रिक पंतप्रधान पदाचा बहुमान मिळवलेला आहे. काल सायंकाळी सातच्या सुमारास राष्ट्रपती भवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यात नरेन्द्र मोदींनी संविधानाला स्मरण करून राष्ट्रपती द्रोपदी मुरमु यांच्याकडून शपथ घेतली. सन्माननीय नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर बोरगाव येथे नगरसेवक व भाजप नेते शरद जंगठे व सुनील पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी व गुलालाची उधळण करत शहरात सर्वत्र फटाके उडविले तर येथील भाजीपाला मार्केटच्या आवारात शिशिर सातपुते सह भाजप कार्यकर्त्यांनी मोदींचे अभिनंदनपर डिजिटल उभा करून माजी खासदार अण्णासाहेब जोले व माजी मंत्री व निपाणीच्या विद्यमान आमदार सौ शशिकला जोल्ले यांच्या नावाचा जय जयकार केला.आणि विजयाची घोषणा देऊन आनंद उत्सव साजरा केला. यावेळी भाजप नेते, कार्यकर्ते उपस्थीत होते.
वसुंधरा शक्ती न्यूजसाठी बोरगावहुन अजित कांबळे.