नीट परीक्षेत केसीपीच्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम

 नीट परीक्षेत केसीपीच्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम 


इचलकरंजीची येथील विशाल पागडे यांच्या किशोर करिअर पॉईंट (केसीपी) च्या नीट-२०२४ च्या निकालामध्ये पुन्हा उज्ज्वल यशाची परंपरा केसीपी ने कायम ठेवली आहे. नीट-२०२४ च्या निकालामध्ये कार्तिक सातपुते या विद्यार्थ्याला ७२० पैकी ७०५ गुण मिळाले आहेत. ६०० पेक्षा जास्त गुण असणारे तब्बल ६१ विद्यार्थी आहेत. या निकालाद्वारे केसीपीने पालकांचा विश्वास आणखीनच दृढ केला आहे. ५ मे २०२४ एनटीएने घेतलेल्या मेडिकल प्रवेशासाठीच्या नीट परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. आहे. या परीक्षेमध्ये ७२० पैकी कार्तिक सातपुते ७०५, प्रज्वल पाटील ६९१, प्रियांका नरूटे ६९०, अथर्व तोष्णीवाल ६८५ गुण मिळवून इचलकरंजी शहरात अव्वल आले आहेत. विशाल पागडे यांच्या किशोर करिअर पॉईंटने गेली ७ वर्षे सातत्याने जेईई, नीट, सीईटी परीक्षांमध्ये धवल यश संपादन केले आहे. महाराष्ट्रामध्ये या परीक्षांच्या सरासरी निकालात केसीपी नेहमी अव्वलस्थानी राहिला आहे. पालक आणि विद्यार्थ्यांनी केसीपीच्या गुणवत्तेवर, अथक परिश्रमावर तज्ञ अनुभवी फॅकल्टीच्या मार्गदर्शनावर व शिस्तबध्द नियोजनावर विश्वास ठेवला आहे. त्यामुळे शहराबरोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या परीक्षांचे आव्हाना सोपे करून दिले आहेत. या यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार अकॅडमीचे अध्यक्ष विशाल पागडे, संचालिका ज्योती पागडे, चीफ कोऑर्डिनेटर डॉ. पुजा रूईकर, दत्तात्रय पिट्टा व सर्व प्राध्यापकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

Post a Comment

Previous Post Next Post