हर्षल राजेंद्र काणे या पोलीस पुत्राच्या यशाचा थक्क करणारा प्रवास युवकांसाठी प्रेरणादायी

हर्षल राजेंद्र काणे या पोलीस पुत्राच्या यशाचा थक्क करणारा प्रवास युवकांसाठी प्रेरणादायी 


ज्याला जन्मा पासुन आज पर्यंत संघर्ष करावा लागला त्या हर्षल राजेंद्र काणे च्या यशाची कहाणी आहे. हर्षल'चा जन्म झाल्यानंतरच जगण्यासाठी केलेला 14 दिवसाचा संघर्ष फारच वेदनादायी होता. मराठी माध्यमातून शिक्षण घेत दहावी पर्यंत शिक्षण पूर्ण केले व त्यानंतर पदवीपर्यंतचे शिक्षण घेण्यासाठी त्याला अनपेक्षितपणे संघर्ष करावा लागला. प्रत्येक टप्प्यावर त्याला अपयश येत होते. तरीही त्याने खचून न जाता निराश न होता व कोणालाही आपल्या अपयशामध्ये सामील करून न घेता स्वतःशीच हर्षल लढत राहिला व शेवटी जिंकला आणि अमेरिकेला उच्च शिक्षणासाठी गेला आणि त्याचे एक स्वप्न पूर्ण झाले. अमेरिकेमध्ये गेल्यापासून ते आजचा दिवस येईपर्यंत त्याने या चार वर्षाच्या काळात पुन्हा स्वतःला सिद्ध करण्यासाठी स्वतःच्या शिक्षणासाठी लागणारा पैसा उभा करण्यासाठी त्याने केटरिंगमध्ये वेटर, हमाल व ड्रायव्हर म्हणून काम करून शिक्षणासाठी पैसा उभा केला, कारण त्याला त्याचे स्वप्न स्वत:च्या हिमतीवर पूर्ण करायचे होते. ते स्वप्न होते, जगाच्या नकाशावर स्वतःला सिद्ध करून जगातील नामांकित अशा गुगल, ॲपल अशा मोठ्या उत्पादक कंपनीमध्ये किंवा बँक ऑफ अमेरिका सारख्या मोठ्या फायनान्शियल कंपनीमध्ये काम करायचे होते. हर्षल त्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी जिद्दीने, मेहनतीने, कष्टाने, हिमतीने लढत राहिला, लढत राहिला म्हणूनच आज तो जिंकला ! हर्षल ला बँक ऑफ अमेरिकामध्ये नोकरी लागली असून त्याला सहा डिजीटमध्ये वर्षाचे पॅकेज मिळाले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post