सुपर वॉरिअर्सने बुथवर लक्ष केंद्रीत करावे ; निर्मलकुमार सुराणा यांच्या सूचना




लोकसभा निवडणूकीसाठी भाजपाकडून १३४ सुपर वॉरिअर्स (योध्दा) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. इतरत्र लक्ष न घालता प्रत्येक वॉरिअर्सने दोन बुथवर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना महाराष्ट्राचे निवडणूक सहप्रभारी आमदार निर्मलकुमार सुराणा यांनी दिल्या. सुराणा यांनी प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांच्या उपस्थितीत हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील विधानसभानिहाय भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक रचनेचा रविवारी इचलकरंजीत आढावा घेतला. सुराणा यांनी बुथप्रमुख, पेजप्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख यांची माहिती घेऊन संघटनात्मक पातळीवर यंत्रणा सक्षम करण्याच्या सूचना देण्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या काळात राबविण्यात आलेल्या विविध योजना घरोघरी पोहचवाव्यात, असे सांगीतले सुराणा म्हणाले, सुपर वॉरिअर्सनी बुथप्रमुख, पेजप्रमुख यांची बैठक घ्यावी. घर टु घर जावून उमेदवाराचा जाहीरनामा पोहचवावा. संघटनेतील प्रमुखांची बैठक घेऊन त्यांना कार्यरत करावे. इतरत्र लक्ष न घालता आपल्या बुथवर प्रामुख्याने लक्ष केंद्रीत करावे.सुपर वॉरिअर्समध्ये प्रदेश उपाध्यक्षापासून सामान्य कार्यकर्त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. यावेळी विक्रम पावसकर, जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर, जिल्हा सरचिटणीस शहाजी भोसले, शहराध्यक्ष पै.अमृत भोसले, अश्विनी कुबडगे, तानाजी पोवार, अशोक स्वामी, वैशाली नाईकवडे, मनोज हिंगमिरे, दिलीप मुथा आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post