युवकाना अभ्यासाबरोबरच व्यायामाची सवय लावावी मा. जि प सदस्य अरुण पाटिल
कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे)
व्यायाम ही सध्या काळाची गरज असून युवक आणि अभ्यासाबरोबर स्वतःच्या शरीरचने कडे लक्ष देणे गरजेचे आहे परिणामी काही वेळा पुस्तके ज्ञानापेक्षा शारीरिक क्षमता मोठे काम करून जाते त्यासाठी आज अत्याधुनिक व्यायाम शाळा गरजेच्या असून या दृष्टीने कुंभोज येथील इफेक्टर जिमचे काम उल्लेखनीय असल्याचे मत जिल्हा परिषदेचे सदस्य वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील यांनी बोलताना व्यक्त केले. ते कुंभोज तालुका हातकणंगले येथे इफेक्टर जिमच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी गेल्या चार वर्षात इफेक्टर जिमने कुंभोज परिसरात मोठे नावलौकिक केले असून अनेक युवकांना त्यांनी व्यायामाची सवय लावली आहे .याबद्दल सदर इफेक्टर जिमचे संस्थापक शैलेश मगदूम व आर्या नेतले यांचा सत्कार वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी इफेक्टर जिम व पायस हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या एकूण 65 रक्तदात्यांनी रक्तदान केले.यावेळी कुंभोज माजी महात्मा गांधी तंटामुक्त कमिटीचे अध्यक्ष अजित गोपुडगे, संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य अमोल गावडे ,संदेश भोसले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष प्रमोद सपकाळ, विठ्ठल सपकाळ तसेच जिमचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.