इचलकरंजी शहर आम आदमी पार्टीच्यावतीने विविध प्रश्ना संदर्भात महानगरपालिका उपायुक्तांना दिले निवेदन
इचलकरंजी शहर आम आदमी पार्टीच्यावतीने आयुक्त ओमप्रकाश दिवटे व उपायुक्त तैमूर मुलानी यांना इचलकरंजी महानगरपालिका हद्दीतील पाणी, पार्किंग, ट्रॅफिक सिग्नल यासंदर्भातील निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली. यावर आयुक्त यांनी ट्रॅफिक अधिकाऱ्यांशी चर्चा करून बिग बजार व महासत्ता चौक या ठिकाणी सिग्नल बसण्याची व्यवस्था करण्यात येईल व पाणीप्रश्न आठ दिवसात एक आड दिवस पाणी सोडण्यात येईल असे आश्वासन दिले.
यावेळी आम आदमी पार्टी इचलकरंजी शहराध्यक्ष प्रकाश सुतार, उपाध्यक्ष रावसाहेब पाटील, जावेद मुल्ला, संघटक यशवंत भंडारी, युवा आघाडी अध्यक्ष संतोष भागवत, शिवाजी माने, मोजस आवळे, मनीष शिकलगार, अर्जुन वाघुळकर, अशोक मगदुम आदी कार्यकर्ते उपस्थित होते.