इचलकरंजीत विविध मागण्यांसाठी बांधकाम कामगारांचा मोर्चा

इचलकरंजीत विविध मागण्यांसाठी बांधकाम कामगारांचा मोर्चा

वस्तु नको-जेवण नको-पैसे द्या, ६० वर्षावरील कामगारांना ५ हजार रुपये पेन्शन द्या यासह विविध मागण्यांसाठी आज हातकणंगले, शिरोळ तालुक्यातील बांधकाम कामगारांनी इचलकरंजीत मोर्चा काढला. मुख्यमार्गावरून घोषणाबाजी करत हा मोर्चा सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर धडकला. यावेळी आंदोलकांनी सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांची भेट घेऊन मागण्यांबाबत चर्चा केली आणि मागण्या मंजुर झाल्याचा आदेश त्वरीत न काढल्यास १६ फेब्रुवारीला मुंबई कामगार मंडळाच्या कार्यालयावर राज्यव्यापी मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला. लालबावटा बांधकाम कामगार संघटना, इमारत इतर बांधकाम कामगार फेडरेशन, महाराष्ट्र राज्य कोल्हापूर जिल्हा कमिटी संघटनेच्यावतीनं विविध मागण्यांसाठी इचलकरंजीत मोर्चा काढण्यात आला. लक्ष्मी मार्केटपासून सुरु झालेला हा मोर्चा मुख्यमार्गावरून घोषणाबाजी करत सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर पोहचला. 

यावेळी सहाय्यक कामगार आयुक्त भोईटे यांची भेट घेऊन वस्तु नको-जेवण नको- पैसे द्या, ६० वर्षावरील कामगारांना ५ हजार रुपये पेन्शन द्या, अवजारे खरेदी योजना, मेडिक्लेम योजना सुरु करावी, नोंदणी-नुतनीकरण आणि लाभाचे अर्ज तपासून तात्काळ लाभ देण्याची मागणी केली. या मागण्या मंजुर झाल्याचा आदेश त्वरीत न काढल्यास १६ फेब्रुवारीला मुंबई कामगार मंडळाच्या कार्यालयावर राज्यव्यापी मोर्चा काढून आक्रोश करण्याचा इशारा देण्यात आला. या आंदोलनात इचलकरंजीसह हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातील बांधकाम कामगार सहभागी झाले होते.

Post a Comment

Previous Post Next Post