इचलकरंजी शहर व परीसातील सकलमराठा समाज्याच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आ.आवाडे यांची भेट

 इचलकरंजी शहर व परीसातील सकलमराठा समाज्याच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आ.आवाडे यांची भेट



मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात बोलावण्यात येणाऱ्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आमदार प्रकाश आवाडे यांनी केले. इचलकरंजी शहर व परिसरातील सकल मराठा समाजाच्यावतीने आमदार आवाडे यांना निवेदन देऊन विधानसभेच्या विशेष अधिवेशनात आरक्षणासंदर्भातील मराठा अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करावे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात काढलेल्या अधिसूचनेची तत्काळ अंमलबजावणी करावी, शासनाने 'सगेसोयरे' चा कायदा मंजूर करावा, अंतरवाली सराटीतील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत यासंदर्भात आपण विधानसभेत आवाज उठवावा, अशी मागणी केली. यावेळी पै.अमृत भोसले, संतोष सावंत, रवींद्र पाटील, मोहन मालवणकर, सुनील शेलार, धनाजी फोफले, वैशाली कदम, वैभव खोंद्रे, धनंजय पाटील, भरत खडसरे, अवधूत मुडशिंगकर, दिलीप पाटील, सुधीर मोरे, सुरज लाड, उत्तम चव्हाण, रामदास टिकले,अमोल पाटील, उत्तम चौगुले, अमर वाडीकर, विजय चव्हाण आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post