माणगाव येथील लंडन हाऊस व होलिग्राफीशोचे उद्घाटनचे १५ दिवसात घ्यावे ; मा.आ.मिणचेकर
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे माणगाव येथील राष्ट्रीय स्मारकाचा प्रश्न मार्गी लावावा व पूर्ण झालेल्या लंडन हाऊस व होलिग्राफी शोचे उद्घाटनचे १५ दिवसात घ्यावे यांचे निवेदन जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना देण्यात आले होते. यावर काही निर्णय न झाल्याने १२ फेब्रुवारी पासुन माणगावचे सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य तसेच ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे आमरण उपोषणास बसले असून या उपोषण स्थळी पहिल्या दिवशी मा.आमदार डॉ. सुजित मिणचेकर संचालक - गोकुळ दूध संघ, कोल्हापूर यांनी भेट देऊन पाठींबा दिला. यावेळी बोलतांना डॉ. मिणचेकर म्हणाले मी आमदार असताना शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा करून निधीसाठी वेळप्रसंगी अधिवेशन काळात विधानभवनाच्या पायरीवर उपोषण करून माणगाव येथील स्मारकाचा आराखडा मंजूर करुन २ कोटी ३८ लाख इतक्या रक्कमेचा निधी मंजूर करून आणण्याचे भाग्य मला मिळाल आहे, या निधीतून जूने समाज मंदीर असेल, होलोग्राफी शो, लंडन हाऊस, माणगाव फाटा येथील कमान इ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. तसेच झालेल्या कामाचे उद्घाटन सोहळा तारीख शिवसेनेचे सरकार असताना मिळाली होती पण कोरोनामुळे कार्यक्रम रद्द करावा लागला. त्यांनतर परत सरकार बदलले व याकडे दुर्लक्ष झाले. पण आज सरपंच राजु मगदूम यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या उपोषणाला यश येईल व आपल्या मागण्या लवकरात लवकर मान्य होतील या आंदोलनाच्या माध्यमातून विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अपूर्ण असलेले स्मारक येणाऱ्या काळात जास्तीत जास्त निधी मंजूर करुन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक पूर्ण करूया असे सांगितले. यावेळी माणगाव गावातील सरपंच उपसरपंच सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपोषण स्थळी उपस्थित होते.