ज्येष्ठ प्रगतशील शेतकरी बाळकृष्ण राजमाने यांचे निधन
Vasundhara Shakti news
तेरवाड ता.शिरोळ येथील जुन्या काळातील नामवंत पहिलवान बाळकृष्ण आण्णाप्पा राजमाने वय ९८ यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. बाळकृष्ण राजमाने हे संस्थान काळातील नामवंत पहिलवान होते त्यांनी तेरवाड येथील स्वतः च्या घरामध्ये तालीम तयार करून अनेक पहिलवान तयार केले होते. त्या काळात त्यानी एस.पी. हायस्कूलमधील रेसलिंग एरिना या कुस्ती मैदानात कुस्ती करून ती जिंकली होती. गुरुवारी सकाळी त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले त्यांच्या अंत्ययात्रेत परिसरातील राजकीय शैक्षणिक सहकार क्षेत्रातील पदाधिकारी अधिकारी सहभागी झाले होते. एस.पी.स्कूलचे ज्येष्ठ शिक्षक दत्तात्रय राजमाने यांचे ते वडील होते. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात त्यांचा लहान भाऊ बाबुराव आण्णाप्पा राजमाने आर्मी रिटायर, दुसरा भाऊ शंकर आण्णाप्पा राजमाने - शेतकरी तसेच त्यांचा मुलगा दत्तात्रय बाळकृष्ण राजमाने एस.पी.हायस्कूल शिक्षक, दुसरा मुलगा आण्णासाहेब बाळकृष्ण राजमाने शेतकरी तसेच मुली, सुना, नातवंडे-परतुंडे असा परिवार आहे.