इचलकरंजीत हवेच्या प्रदूषणावर नियंत्रणासाठी भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाची महापालिकेला मागणी

इचलकरंजीत हवेच्या प्रदूषणावर नियंत्रणासाठी भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाची महापालिकेला मागणी

Vasundhara Shakti News 

इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रातील हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या शिष्टमंडळाने उपआयुक्त स्मृती पाटील यांची भेट घेऊन विविध उपाययोजनांची मागणी केली. युवा मोर्चाचे शहराध्यक्ष जयेश बुगड यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महापालिका प्रशासनाला राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निवेदन दिले. हरात वाढत्या धुळीमुळे आणि हवेच्या दर्जात होणाऱ्या सततच्या घसरणीमुळे नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने मुख्य रस्त्यांवरील धूळ कमी करण्यासाठी जल फवारणी (वॉटर स्प्रिंकलर) टँकरद्वारे स्वच्छता करावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच, हवेतील धूलिकण कमी करण्यासाठी फॉगिंग करणे, रस्ते व डिव्हायडर धुणे, डिव्हायडरवरील झाडांना पाणी देणे यांसारख्या उपाययोजना राबवाव्यात, असे सुचवण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीत फायर फायटिंगसाठीही या टँकरचा उपयोग करता येऊ शकतो, असे नमूद करण्यात आले. यावर उपआयुक्त स्मृती पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच प्रस्ताव महापालिका आयुक्तांकडे पाठवला जाईल, असे आश्वासन दिले.‌ यावेळी जयेश बुगड, मनोज तराळ, उमाकांत दाभोळे, मोहन कुंभार, आदित्य पाटील, प्रवीण बनसोडे, राहुल गागडे, विष्णू पाखरे, हर्षवर्धन गोरे, प्रदीप कांबळे, अमित माछरे, आदित्य बनसोडे, विशाल शिरगावे, श्रेयश गट्टानी, रोहन कुंभार आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post