मथुरा हायस्कूलचे मुख्याध्यापक श्रीकांत चव्हाण यांना मराठा मंडळाचा गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान

मथुरा हायस्कूलचे मुख्याध्यापक श्रीकांत चव्हाण यांना मराठा मंडळाचा गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान

इचलकरंजी येथील दातार मळा परिसरात असलेल्या मथुरा हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री.श्रीकांत गजानन चव्हाण यांना शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर दिला जाणारा 'गुणवंत शिक्षक पुरस्कार' मिळाला. सुप्रसिद्ध व्याख्याते, कीर्तनकार मा.श्री. इंद्रजीत देशमुख यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण झाले. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.हिंदुराव शेळके, कार्यवाह मा.श्री.विवेक शेळके यांनी त्यांचे अभिनंदन केले. हा पुरस्कार म्हणजे त्यांनी आजपर्यंत मथुरा शिक्षण संस्थेसाठी दिलेल्या योगदानाची पोचपावती असल्याचे मानले जाते. सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले, पुरस्कार मिळाल्यानंतरच खऱ्या अर्थाने माणसाची जबाबदारी वाढत राहते. पुरस्काराशी बांधील राहून यापुढे काम करावे लागेल. हा पुरस्कार केवळ माझ्या एकट्याचा नसून तो संस्थेच्या प्रत्येक घटकाचा आहे. प्रत्येक घटकाने दिलेल्या योगदानाची ही खऱ्या अर्थाने पोहोच पावती आहे . या सोहळ्यासाठी मथुरा शिक्षण संस्थेच्या तिन्ही शाखांचे सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post