कबनुर हद्दीतील कचरा इचलकरंजी हद्दीत टाकणाऱ्या घंटागाडी चालकावर कारवाई करणेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांचे आदेश
कबनूर हद्दीतील कचरा घंटागाडीमधून इचलकरंजी शहरात हद्दीत टाकत असल्याची गंभीर बाब संतोष हत्तीकर यांनी महानगरपालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी तातडीने संबंधितावर प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश आरोग्य अधिकारी डॉ.सुनीलदत्त संगेवार यांना दिले होते. या आदेशानुसार तुकाराम आण्णाप्पा कदम रा.वॉर्ड नं.१५, इचलकरंजी यांच्या विहीरीमध्ये कबनूर ग्रामपंचायतीच्या घंटागाडीव्दारे विनापरवाना कचरा टाकून इचलकरंजी शहरातील नागरिकांच्या आरोग्यास व शहरातील पर्यावरणास धोका उत्पन्न केलेने तुकाराम आण्णाप्पा कदम व घंटागाडी चालक अतुल दशरथ चव्हाण यांचेवर प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नियमानुसार पुढील कार्यवाही करणेची प्रक्रिया सुरू आहे.