कारवे येथे झालेल्या कबड्डी स्पर्धेमध्ये समाजसेवक नरसू शिंदे फौंडेशन,नेसरी तृतीय क्रमांकाचा मानकरी
कारवे येथे झालेल्या कबड्डी स्पर्धेमध्ये समाजसेवक नरसु दादा फौंडेशन,नेसरी तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला यामध्ये दिपक कदम, रायडर आदर्श नाईक, रायडर रामराज नाईक, ऑलराऊंडर वेदांत पाटील, प्रथमेश नाईक, सुशांत चव्हाण, अभिजीत फगरे, कोच ऋषिकेश चव्हाण यांनी सहभाग घेतला जनसेवा समाजसेवक नरसु शिंदे फौंडेशनच्या माध्यमातून अनेक खेळाडू जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय खेळून आलेले आहेत व इथून पुढे त्यांच्यासाठी ग्रामीण भागात कसे प्रोत्साहन देता येईल यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी नेहमी फौंडेशनचे समाजसेवक नरसु शिंदे हे प्रयत्न करत आहेत. ग्रामीण भागातील जास्तीत जास्त मुलांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करावी तसेच त्यांचे व देशाचे नाव उज्वल करावे ह्या अपेक्षेने जनसेवा नरसु दादा शिंदे फौउंडेशन नेसरी हे सदैव प्रयत्न करत आहेत. यासाठी कुणाल नाईक, बाबू नाईक, रुपेश नाईक, किसन नाईक, राहुल कदम पदु कांबळे यांचे सहकार्य लाभले.