इचलकरंजीत उद्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत महिला मेळावा
महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांच्या समर्थनाथ खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या उपस्थितीत महिला मेळाव्याचे आयोजन येथील काँग्रेस कमिटी येथे उद्या सायंकाळी ६ वाजता करण्यात आले आहे. यासंदर्भातील बैठक आज शनिवारी काँग्रेस कमिटी मध्ये पार पडली. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी महिलांना आवाहन करण्याचे काँग्रेस कमिटी मध्ये झालेल्या बैठकीत एक मुखाने ठरविण्यात आले.
कारंडे यांना आजी-माजी नगरसेवक, विविध पक्षाचे पदाधिकारी, संघटना यांचा पाठींबा वाढत आहे. त्याचबरोबर महिला वर्गातून कारंडे यांच्या उमेदवारी बाबत उत्सुकता आहे. याच पार्श्वभूमीवर महिलांशी संवाद साधण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रियाताई सुळे काँग्रेस कमिटी येथे येणार आहेत. यावेळी त्या उपस्थित महिलांना संबोधित करून महाविकास आघाडीशी महिलांविषयी धोरणे, महिलांच्या प्रगती विषयी असणारे महाविकास आघाडीचे व्हिजन याबाबत चर्चा करणार आहेत. तरी या मेळाव्यास महिलांनी उपस्थित रहावे असे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी उमेदवार मदन कारंडे, हिंदुराव शेळके, काँग्रेसचे संजय कांबळे, राहुल खंजिरे, मँचेस्टर आघाडीचे सागर चाळके, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सयाजी चव्हाण,आण्णा शेट्टी, मा.उपनगराध्यक्ष रणजित जाधव, माजी नगरसेवक उदयसिंग पाटील, प्रताप होगाडे,बंडा मुसळे अब्राहम आवळे, माजी जिल्हा परिषद सदस्य देवानंद कांबळे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.