मा.नगराध्यक्ष राजाराम धारवट व मा.नगरसेवक जयवंत लायकर यांचा राहुल आवाडे यांना पाठींबा
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांना माजी नगरसेवक जयवंत लायकर, माजी उपनगराध्यक्ष राजाराम धारवट आणि रणजित लायकर यांनी आपला पाठींबा दिला आहे. भारतीय जनता पार्टी शहर कार्यालयात आमदार प्रकाश आवाडे यांचे हस्ते आणि भाजपा जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर, शहराध्यक्ष पै.अमृत भोसले यांच्या उपस्थितीत या सर्वांचे स्वागत करण्यात आले. महायुतीतील भाजपाकडून राहुल आवाडे यांना इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यापासून अनेक आजी-माजी पदाधिकारी, नगरसेवकांनी आवाडे यांना पाठींबा दिला आहे. त्यातुन भाजपा आणि राहुल आवाडे यांना भक्कम पाठबळ प्राप्त होत चालले आहे. बुधवारी शहर भाजपा कार्यालयात झालेल्या बैठकीत माजी उपनगराध्यक्ष राजाराम धारवट, माजी ज्येष्ठ नगरसेवक जयवंत लायकर व रणजित लायकर यांनी आपल्या समर्थकांसह महायुतीचे उमेदवारी राहुल आवाडे यांना पाठींबा दिला. या सर्वांचे स्कार्फ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. लायकर आणि धारवट हे ज्येष्ठ नगरसेवक असून त्यांना मानणारा मोठा वर्ग शहरात आहे. त्यांच्या पाठबळामुळे आवाडे यांचा विजय सुकर होण्यास मोठी मदत होणार आहे.याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, दिलीप मुथा, मिश्रीलाल जाजू, शहाजी भोसले, उदय बुगड, धोंडीराम जावळे, पांडुरंग म्हातुकडे आदींसह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.