समाजसेवक नरसु शिंदे यांच्या हस्ते पोसरातवाडी सिद्धिविनायक तरुण मंडळाच्या गणपतीची आरती संपन्न
पोसरातवाडी तालुका आजरा येथील सिद्धिविनायक तरुण मंडळाच्या आरतीचा मान समाजसेवक नरसू शिंदे यांना देण्यात आला तसेच यावर्षी मंडळाला पंचवीस वर्षे पूर्ण झाले आहेत या पंचवीस वर्षात मंडळाने सामाजिक, शैक्षणिक प्रोत्साहन देण्याची काम केली आहे. यावेळी मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल देसाई, उपाध्यक्ष रवळू पाटील, आजरा तालुका पोलीस पाटील अध्यक्ष युवराज देसाई, ग्रामपंचायत सदस्य मनीषा अमृतकर, अशोक कनुकले ,मकरंद पाटील, गजानन पाटील, संजू पाटील, केशव देसाई, विष्णू पाटील, निलेश पाटील, रवळनाथ सोसायटीचे चेअरमन सुनील पाटील, शंकर पाटील, सुदेश पाटील, संभाजी पाटील, राजेंद्र पाटील, विलास पाटील, सुरेंद्र पाटील, संभाजी शिंदे, समीर शिंदे, नितेश पाटील, निलेश पाटील, सुरेश पाटील, विजय अमृतकर, संतोष अमृतकर आदिंसह ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.