बोरगाव येथील नगरसेवक शरद जंगठे यांना पितृशोक
बोरगाव येथील प्रगतशील शेतकरी,कष्टाळू व्यक्तिमत्त्व, व्यावसायिक, निपाणी येथील हालसिदनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक व आचार्य श्री 108 शांतीसागर को आप क्रेडिट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष, नगरसेवक शरद जंगठे यांचे वडील बाळासाहेब जंगठे यांचे आज मंगळवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले आहे. ते 70 वयाचे होते. जंगठे परिवारात ते ज्येष्ठ होते. कै.बाळासाहेब जंगठे यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केले जात आहे. त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षा विसर्जन बुधवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजता बोरगांव येथे होणार आहे.
वसुंधरा शक्ती न्यूजसाठी बोरगांवहुन अजित कांबळे