श्री.व्ही.के.चव्हाण-पाटील ग्रामीण बिगरशेती सह.पत संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
श्री.व्ही.के.चव्हाण-पाटील ग्रामीण बिगरशेती सह.पत संस्था मर्यादित कोळिंद्रे ता आजरा या संस्थेच्या सर्व विद्यमान सभासदांची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार दिनांक २६ ऑगस्ट २०२४ रोजी संस्थेचे संस्थापक विद्यमान चेअरमन श्री विष्णूपंत मोतबा केसरकर साहेब यांचे अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात सभासदांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली. सभेच्या सुरुवातीला पोश्रातवाडीचे समाजसुधारक मा.श्री.नरसु शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते फोटो पुजन करुन सभेचा शुभारंभ करण्यात आला. प्रास्ताविक व अहवाल वाचन संस्थेचे जेष्ठ संचालक श्री.सुरेशराव बुगडे सर यांनी केले. विषय पत्रिकेवरील इतर सर्व विषय संस्था मॅनेंजर श्री.सुरेश करडे यांनी केले. या सभेवेळी संस्थेचे विद्यमान चेअरमन विष्णूपंत केसरकर, व्हा.चेअरमन शंकरराव बुगडे, संचालक श्री.सुरेशराव बुगडे, विजय केसरकर, तानाजी घोळसे, तानाजी जाधव, जोतिबा देसाई, भिकाजी गोंधळी, अनुसया संकपाळ, सौ.सोना शिवाजी नाईक आदींसह संस्थेचे विद्यमान सभासद-सदस्य उपस्थित होते.