जनसेवा समाजसेवक नरसू शिंदे सामाजिक संस्थाच्यावतीने अक्षय कांबळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
जनसेवा समाजसेवक नरसू शिंदे सामाजिक संस्थाच्या वतीने अक्षय कांबळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या अक्षय कांबळे यांनी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील घटकासाठी काम केले आहे तसेच संविधान बचाव चळवळ जोमात सुरू ठेवली आहे. त्यांच्या कार्याला शुभेच्छा देण्यासाठी व वाढदिवसाच्या औचित्य साधून जनसेवा समाजसेवक नरसू शिंदे सामाजिक संस्थाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या याप्रसंगी मुक्ती संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याचे राज्यसंघटक संग्राम सावंत तर जनसेवा समाजसेवक नरसू शिंदे सामाजिक संस्था कोळींद्रे यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी समाजसेवक नरसु शिंदे, प्राध्यापक सुरेश बुगडे, ग्रामपंचायत सदस्य भिकाजी गोंधळी, ग्रामपंचायत सदस्य विजय कांबळे, आनंदा सुतार, संतराम कुऱ्हाडे, मेजर सुधाकर पाटील, भैरू सुरांगे, भूषण गुरव, मारुती उगाडे विशाल गाईंगडे महेश पाटील आदी उपस्थितीत होते.