दक्षिण भारत जैन सभेला खऱ्या अर्थाने रावसाहेब पाटील दादां मुळे मिळाली नव संजीवनी ; माजी मंत्री जयंत पाटील
भारत देशाला अनेक संस्कृतीचा वारसा आहे.प्राचीन काळापासून देशात जैन धर्माने अंहिसा व तीर्थंकर यांचे विचार रुजविण्याचे सकस प्रयत्न केले आहेत. यामध्ये देशातील दक्षिण भारत जैन सभेने मोलाचं कार्य करीत आहेत,गेल्या अनेक वर्षांपासून बोरगांव येथील श्री रावसाहेब पाटील यांनी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष पदातून जैन धर्माला सवलती प्राप्त करून दिले आहेत. असे मत महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष श्री जयंत पाटील यांनी केले. ते बोरगांव येथिल दिवंगत रावसाहेब पाटील यांच्या घरी कुटुंबीयांचे सांत्वन कार्यक्रमात बोलत होते. रावसाहेब पाटील दादा यांच्या माध्यमातून सांगली येथील दक्षिण भारत जैन सभेचे शंभराव्या अधिवेशन कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडले. खऱ्या अर्थाने दादांच्या यशस्वी प्रयत्नामुळे सभेला हत्तीचे बळ प्राप्त झाले आहे. अशा अनेक आठवणींना जयंत पाटील यांनी उजाळा दिला. यावेळी अरिहंत उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक श्री अभिनंदन पाटील सहकार रत्न श्री उत्तम पाटील, युवा नेते पृथ्वीराज पाटील,भालचंद्र पाटील, निरंजन पाटील सरकार, निपाणीचे नगरसेवक दिलीप पठाडे, विनायक वडे, संजय सांगावकर आदिंसह परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
वसुंधरा शक्ती न्यूजसाठी बोरगांवहुन अजित कांबळे