माणकापूर'मध्ये यंत्रमाग कामगारावर चाकू हल्ला

माणकापूर'मध्ये यंत्रमाग कामगारावर चाकू हल्ला 


माणकापूर ता.निपाणी दि.४ रोजी पहाटे सागर बापू कुंभार वय वर्षे ५५ या यंत्रमाग कामगारावर जीवघेणा चाकू हल्ला,मनोहर कोरवी या माथेफिरूने केला आहे . त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.सदर जखमी सागर कुंभार यांच्या वर चिकोडी सरकारी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. सदर घटनेचा तपास सदलगा पोलीस करीत आहेत.याबाबत घटनास्थळावरून समजलेली अधिक माहिती अशी कि.सागर कुंभार हे देवगोंडा चौगुले यांच्या यंत्रमाग कारखान्यात कामावर आहेस.ते नेहमी प्रमाणे रात्र पाळी करीत असताना गुरवारी पहाटे माथेफिरू व मनोरुग्ण असलेला,मनोहर कोरवी कारखान्यात येवून संशयास्पद हालचाल करीत होता‌.यावेळी सागर कुंभार यांनी त्यास विचारता त्यानी चाकूने मानेवर हल्ला केला.अचानक झालेल्या या हल्ल्याने त्यानी आरडाओरडा करताच हल्लाखोर कोरवीने घटनास्थळावरून पळ काढला. ग्रामपंचायत सदस्य राजू कुंभार, ग्रामपंचायत माजी अध्यक्षा वैशाली कुंभार यांनी घटनास्थळी धाव घेतले त्यावेळी सागर कुंभार रक्ताच्या थारोळ्यात विव्हळत पडले होते जखमीस चिकोडीच्या जनरल हॉस्पिटलमध्ये तातडीने दाखल केले आहे. सदर हल्लेखोर कोरवी यांचे मानसिक संतुलन बिघडले असुन त्यानी अनेक वेळा ग्रामपंचायत कार्यालयात धुडगूस करुन साहित्याची मोडतोड करून ग्रंथालयातील पुस्तकेही फाडली आहेत. ग्रामपंचायत मधील लेडीज कर्मचाऱ्यांना अश्लील बोलणे यासह अनेक उपद्रव कोरवी यांनी केले आहेत. माणकापूर ग्रामपंचायत पदाधिकारी मनोहर कोरवीच्या नातेवाईकांना ही बाब सांगितली असून त्याला लवकरच रत्नागिरीच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची व्यवस्था केली आहे असे नातेवाईकांनी ग्रामपंचायतीचे अध्यक्ष सुनील म्हाकाळे यांना सांगितले होते.तोपर्यंत परत सकाळी हा प्रकार केल्याने माथेफिरू कोरीवीवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. घटनास्थळी सदलगा पोलीस, आपत्ती पोलिस दल दाखल होऊन पाहणी केली आहे.

वसुंधरा शक्ती न्यूजसाठी बोरगांवहुन अजित कांबळे

Post a Comment

Previous Post Next Post