इचलकरंजी महानगरपालिकेच्यावतीने छत्रपती शाह महाराजांना अभिवाद
महानगरपालिकेच्यावतीने गुरुवार दिनांक. २६ जून रोजी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त शहरातील कोल्हापूर रोडवरील छत्रपती शाहू महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या हस्ते आणि उपायुक्त नंदु परळकर, उपायुक्त अशोक कुंभार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले. याप्रसंगी सहा.आयुक्त विजय राजापुरे, आरोग्य अधिकारी डॉ.सुनिलदत्त संगेवार, अभियंता बाजी कांबळे, समाज विकास अधिकारी सुनील शिंदे, सहा.लेखा परीक्षक धनंजय पळसुले, शितल पाटील, क्रीडा अधिकारी संजय शेटे, संदीप जोशी, महिला व बाल विकास अधिकारी बेबी नदाफ, भांडार अधिक्षक सुजाता दाभोळे, सुनील बेलेकर, सदाशिव जाधव, गणेश शिंदे, सहा. क्रीडा अधिकारी संजय कांबळे, सचिन खोंद्रे, मनोज खंदारे, महेश बुचडे आदी उपस्थित होते.